शहरातील निर्जंतुकीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम ; शासनाने काढला आदेश ; खाजगी संस्था वा व्यक्तींना फवारणीस बंदी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र स्थानिक लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागात स्वतःच फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे शिवाय अनेकांनी पाठीवर पंप घेऊन स्वखर्चातून जंतूनाशकाची फवारणी केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. परंतु यामुळे औषधांच्या फवारणीची मात्रा चुकल्यास नागरिकांच्या जीवावर देखील बेतण्याची भीती असल्याने गावात वा शहरात सोडियम हायक्लोप्रोइडची निर्जंतुकीकरण फवारणी ही स्थानिक नगर परीषद किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यांनीच करावी, खाजगी संस्था किंवा व्यक्तींनी करू नये, असे आदेश राज्य शासनाने गुरूवारी काढले आहेत .१ एप्रिल रोजी शासनाचे सचिव डॉक्टर संजीव मुखर्जी यांनी या संदर्भात स्थिती स्पष्ट करणारा आदेश काढला आहे. काही ठिकाणी अनेक पुढारी स्वतः ट्रॅक्टर भाड्याने आणून गावात फवारणी करताना बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तसेच संबंधित फवारणीही नेमकी कसली हे कुणालाही माहिती नाही. याबाबत नगरपालिकेला देखील काही माहिती नसते. फक्त स्वतःचे नाव करून घेण्यासाठी ही फवारणी केली जाते. परंतु अशा प्रकारची फवारणी ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे. इतरांनी कमी-जास्त फवारणी केल्यास नागरिकांच्या जीवाला धोका मोठ्या प्रमाणात पोहचू शकतो म्हणून तातडीने हा जीआर काढण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *