भुसावळात रोटरी क्लब, रॉयल्स व जय गणेश फाऊंडेशनतर्फे संकटकालीन परिस्थितीत होतेय रुग्णांची सेवा ; वाहनांचे पथक रुग्णांच्या सेवेकरीता हजर

भुसावळ (प्रतिनिधी )-
जगासह देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी येथील रोटरी क्लबऑफ भुसावळ , रॉयल्स व जय गणेश फाऊंडेशन या संघटनेच्यावतीने कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज झाले असून आपातकालीन सेवा सुरु केली असून रुग्णानां दवाखान्यात ने -आण करण्याकरीता सेवा देत आहे . यासाठी विशेष वाहनांसह पथक ( २४x७ ) सज्ज झाले असल्याने या उत्कृष्ट सेवाकार्याचे भुसावळकरांनी स्वागत केले. असून जय गणेश फाउंडेशनला धन्यवाद दिले आहे .
या संघटनेच्यावतीने शासनाला सूचविले व त्यानुसार कोरोनाच्या या भयानक संकटकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच लॉकडाऊन असल्याने रुग्णसेवा करण्यासाठी वाहनांची सेवा देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यावरुन प्रशासनाने रुग्नसेवेकरिता लागलीच वाहन परवानगी दिली . तेव्हापासून अनेक रुग्णांना दवाखान्यात उचारार्थ ने-आण करीत आहोत. यात अनेकांना रक्त तपासणी, डायलिसिसकरिता , तसेच गरोदर महिलांना, रक्त दाब कमी – जास्त होणारे रुग्ण यासह अन्य रुग्णांना सेवा देण्यात येत असल्याने अल्पसेवेचे समाधान मिळत असल्याची भावना जय गणेश फाउंडेशनचे उमेश नेमाडे यांनी व्यक्त केल्या .
याकार्यासाठी जय गणेश फाऊंडेशन समन्वयक अरुण मांडाळकर सर, गणेश फेगडे सर, रोटरी रॉयल्स अध्यक्ष उमेश नेमाडे ,सचिव राजेंद्र यावलकर , चैत्राम पवार , राजुसेठ कोटेचा, सूर्यकांत दुसाने, अनुपसिंग ठाकूर,संतोष भंगाळे, खेंमचंद भंगाळे, सुमित यावलकर,प्रवीण गोविंदा पाटील,अतुल पाटील, तुषार झांबरे,राहुल भावसेकर , प्रवीण पाटील मामा,सुमित आहुजा,संतोष ढाके,सचिन चौधरी,जग्गू महाजन,राहुल महाजन,नचिकेत यावलकर,संजय मुळतकर,हर्षल वानखेडे, कृष्णा मराठे,अशोक प्रजापती,हे सर्व वाहनांचे चालक व त्यांच्या सोबत स्वयं सेवक म्हणून कार्यरत असून परिश्रम घेत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *