भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावल विधी सेवा समिती तर्फे 19/02/2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त स्थानिक ओसवाल पंचायत वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले


त्याठीकाणी लहानां पासुन ते जेष्ठां पर्यत सर्व पुरुष व महिला आणि बालमित्र मंडळी आलेले होते तेथे विधी सेवा समिती न जेष्ठ नागरीकांच्या अधिकाराचा प्रचार करण्यासाठी माहिती स्टॉल व पत्रक वाटण्यात आले यावेळी पीएलव्ही रुपाली नेवे यांनी माहीती पत्रक वाटली तसेच पीएलव्ही सौ स्वाती भोळे यांनी विधी सेवा समिती चे सामान्य नागरिकांन साठी काय काम करते यांच महत्व सांगीतले आणि मोफत कायदेशिर सल्ला देण्यासाठी टोलफ्री क्रमांक 15100 माहिती देण्यात आली प्रसंगी जेष्ठ नागरिकांनी या शिबिराचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला .


