भुसावळ (प्रतिनिधी )
शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील कपाट बनविण्याच्या गोडाऊन मध्ये संचारबंदीत मध्ये जादा दराने देशी- विदेशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांना मिळल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बाजारपेठचे पो.ना इरफान काझी,पो ना दीपक पाटील,पो ना रमण सुरळकर,पोहे कॉ युवराज नागरुत,पो हे कॉ माणिक सपकाळे,प्रशांत परदेशी,पो हे कॉ आयज शेख तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कल्याण मुळे व कॉन्स्टेबल नंदू पवार यांनी मिळून सामूहिक कामगिरी केली.सर्व दारूसाठा राज्य उत्पादन शुक्लाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केला.बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोना रमण सुरकळर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.


