वरणगावला रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसात; ८० रक्तदात्यानी केले रक्तदान

वरणगाव (प्रतिनिधी )-
शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन
आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास वरणगावातील प्रचंड प्रतिसात देत ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले .
राज्यात रुग्णाच्या उपचारा साठी आठ दिवस पुरेल असा रक्त साठा असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला रक्तदाना साठी अवाहन केले होते त्या अनुषंघाने शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ भोईटे रुग्णालयात करण्यात आले होते त्यात सुमारे एकशे सत्तावण रक्तदात्यांनी आपली नावाची नोंदणी केली होती त्यात पहिल्या टप्यात ८० रक्तदात्यानी रक्तदान केले यावेळी सर्व रक्तदात्याचे राजेंद्र चौधरी मित्र परिवारा तर्फे प्रमाण पत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले
बस स्थानक चौकातील डॉ राहुल भोईटे यांचा रुग्णालयात सकाळी दहा वाजेच्या सुमारास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो निरिक्षक संदिप बोरसे , डॉ भोईटे , नगरसेवक गणेश चौधरी , रवि सोनवणे , विष्णु खोले , प्रकाश नारखेडे , गोगा शेठ, पप्पू जकातदार यांच्या प्रमुख उपस्थीती शिबीराची सुरुवात करण्यात आली होती . राज्यात कोरोना या विषाणुमुळे परिस्थीती निर्माण झाली व मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या अवाहनाला साद देत ‘ रक्तदान सर्व श्रेष्ठदान’ असुन या भावनेतून छोटासा हातभार असल्याचे यावेळी राजेंद्र चौधरी यांनी सांगत रक्तदात्याचे व परिश्रम घेणाऱ्याचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *