लोकशाहीच्या अस्तित्वासाठी मतदार जागृतीची आवश्यकता.प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे.

भालोद – कला व विज्ञान महाविद्यालय भालोद ता.यावल येथे कला मंडळाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे हे होते याप्रसंगी बोलताना ते म्हणाले भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अनमोल असा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे . भारतीय लोकशाही सशक्त बनवायची असेल टिकून ठेवायची असेल तर प्रत्येकाने जबाबदारीने मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करताना जात ,धर्म ,वंश ,लिंग याला प्राधान्य न देता निर्भीडपणे मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा.सदर कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, डॉ. जतिन मेढे. डॉ. अजय कोल्हे.डॉ. पद्माकर सावळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कला मंडळ प्रमुख डॉ. दिनेश पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली. व मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिनेश पाटील यांनी केले.