भुसावळ – कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.डॉ.एस. व्ही. पाटील हे होते. कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डी. एन. पाटील, प्रमूख वक्ते राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर, कार्यालयीन अधीक्षक . भगवान तायडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.विलास महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.के.राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.संगीता भिरुड, प्रा. भूपेंद्र बानाईत हे उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी मांडली. 25 नोव्हेंबर 1950 राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेचे औचित्य साधून हा दिन साजरा करण्यात येतो. 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी. जात, धर्म,भाषा, प्रदेश निरपेक्ष मतदान झाले पाहिजे यावर प्रकाश टाकला. मतदारांची मतदानाबाबत शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. भूपेंद्र बानाईत यांनी केले.
उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्रांनी मतदार दिनानिमित्त मतदानाची शपथ घेतली. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. जी.आर. वाणी, प्रा.डॉ. पी. ए . अहिरे, प्रा.डॉ. एस.पी.झनके, प्रा. डॉ.एस.टी.धूम, प्रा.डॉ.के.ए.वारके, प्रा. डॉ.ममताबेन पाटील, प्रा.डॉ.सचिन येवले, श्री. सचिन पाटील, श्री.श्रावण न्हावकर, इतर प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते असे प्रा.प्रशांत पाटील यांनी कळविले आहे



