मराठा समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार : माँसाहेब जिजाऊ मराठा महिला मंडळाचा हळदीकुंकू कार्यक्रमातील उपक्रम:

भुसावळ –
माँसाहेब मराठा महिला मंडळाचे हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाभिक समाज भवन विकास कॉलनी येथे संपन्न झाला यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिला ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे अशा महिलांचा राजमाता जिजाऊ चरित्र देऊन गौरव करण्यात आला
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.छाया देशमुख व प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील प्राध्यापिका डॉ. जयश्री देवरे या उपस्थित होत्या महिलांनी जिजाऊंचा वसा पुढे नेला पाहिजे त्यांची शिकवण अंगीकृत करून त्यांनी जसे शिवराय घडवले ज्यामुळे आपण स्वराज्य पाहू शकलो असा चांगला नागरिक घडविण्याचे कार्य आताच्या माता भगिनींनी करावे राजमाता या राजकारण ,समाजकारण अर्थकारण, युद्धकारण्यात निपुण होत्या आणि म्हणूनच त्या युगप्रवर्तक ठरल्या असे यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. जयश्री देवरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले
डॉ.छाया देशमुख यांनी हळदीकुंकू महिलांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने सर्व एकत्र होतात एकमेकांशी ओळख परिचय होतो विचारांची देवाणघेवाण होते महिला स्वतःसाठी वेळ काढत आनंद व्यक्त करतात असे सांगून कविता सादर केली
मंचावर महिला मंडळाच्या नियोजन समिती सदस्य जास्वंदी भंडारी (पाटील) श्रीमती मनोरमा ओगले, अलकाताई भगत, महानंदाताई पाटील उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड जास्वंदी भंडारी यांनी केले प्रास्तविकात त्यांनी हळदीकुंकू कार्यक्रमामुळे समाजातील विखुरलेला महिला एकत्रित झाल्या ही खूप आनंदाची बाब आहे कारण संघटित असलो तरच आपण विपरीत परिस्थितीवर मात करू शकतो हीच शिकवण आपल्याला राजमाता जिजाऊंनी दिली आहे असे सांगून हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचा हेतू विषद केला तालुक्यातील सिंधी कुर्हा यासह शहरातील वीस कर्तृत्व महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राजश्रीताई देशमुख यांनी बहारदार शैलीत केले आभार सौ. स्वाती पाटील यांनी मानले
यावेळी सत्कारार्थी सौ सुरेखा पाटील ,मनीषा देशमुख, सौ दिपाली पाटील, सौ विद्या पाटील सौ.मनीषा तिघे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी सौ मोनाली ओगले डॉ.छाया देशमुख व रुपेश देशमुख, प्रीती चौधरी यांचे सहकार्य लाभले उपस्थित महिला भगिनींना हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली