मुंबई – मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलात लक्षणीय वाढ केली आहे.

मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात डिसेंबर-२०२४ पर्यंत प्रवासी उत्पन्नातून ५,५७० कोटी रुपये कमावले आहेत, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५,४०० कोटी रुपये होते, म्हणजेच ३.१५% वाढ झाली आहे.
यामध्ये डिसेंबर २०२४ पर्यंत उपनगरीय उत्पन्नातून ७२२ कोटी रुपये समाविष्ट आहेत, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६८४ कोटी रुपये होते यामध्ये ५.५०% पेक्षा जास्त वाढ झाली आणि डिसेंबर २०२४ पर्यंत गैर-उपनगरीय उत्पन्नातून ४,८४९ कोटी रुपये जे गेल्या वर्षी याच कालावधीत ४,७१७ कोटी रुपये होते यामध्ये २.७९% ची वाढ दिसून येते.
प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत, मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात डिसेंबर-२०२४ पर्यंत १२०२ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, गेल्या वर्षी याच कालावधीत ११७४ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक झाली होती, जी २.४०% वाढ नोंदवते. यामध्ये या आर्थिक वर्षात १४४ दशलक्ष गैर-उपनगरीय प्रवाशांचा समावेश आहे, गेल्या वर्षी १३८ दशलक्ष गैर-उपनगरीय प्रवाशांच्या तुलनेत, ४.३०% पेक्षा जास्त वाढ आहे. या आर्थिक वर्षात १०५८ दशलक्ष उपनगरीय प्रवाशांची वाहतूक केली, तर मागील वर्षी १०३६ दशलक्ष उपनगरीय प्रवाशांनी वाहतूक केली होती, जी २% पेक्षा जास्त आहे.
विशेष म्हणजे, डिसेंबर २०२४ मध्येच मध्य रेल्वेने १३८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली (ज्यात १२२ दशलक्ष उपनगरीय आणि १६ दशलक्ष गैर-उपनगरीय प्रवासी होते) आणि ६०५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला (ज्यामध्ये ८४ कोटी रुपये उपनगरीय उत्पन्न आणि ५२१ कोटी रुपये गैर-उपनगरीय प्रवासी उत्पन्न होते).


