पंतजली योगपीठाच्या अंतर्गत महिला पतंजली योग समिती भुसावळ तर्फे भव्य मोफत योग शिबिर ;


भुसावळ – ह्दय रोग,उधरक्तचाप,कमरेचे दुखणे , एकाग्रता वाढवणे ,संधिवात,मधुमेह तसेच इतर अनेक आजार व समस्यांवर महिला पुरूष व युवक युवती करीता पतजली योगपीठाच्या अंतर्गत
महिला पतंजली योग समिती भुसावळतर्फे
भव्य मोफत योग शिबिराचे गुरवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५.३० ते ७.३० दरम्यान संतोषी माता हॉल,मातूभुमी चौक,भुसावळ येथे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रमाचे उद्घाटन संजीवनी ताई माने योगरत्न पुरस्कृत, राज्य प्रभारी महाराष्ट्र पूर्व यांचे हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून
मुक्ताई चिकित्सालय वैद्य आशिश राठी , भारत स्वाभिमान संरक्षक भवरलालजी प्रजापती , यौगरत्न पुरस्कृत,राज्य कार्यकारिणी सदस्या
महानंदा पाटील , जिल्हा प्रभारी पतांजली योग समिती जयश्री पाटील, तहसील प्रभारी भुसावळ मीनाताई राजपूत आदी उपस्थित राहणार आहे .

शिबिर सर्वासाठी खुले आहे , तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक महानंदा पाटील, वैद्य आशिष राठी , राजश्री बादशहा , सुरेखा पाटील भवरलाल प्रजापती , माला चौधरी मीना राजपूत , वंदना जंगले , मंदाकिनी केदारे , रुपाली पाटणकर , वर्षा लोखंडे , पूनम साकला , अंजली वाघमारे यांनी केले आहे . योग साधकांनी सोबत मॅट किंवा सतरंजी सोबत आणावी .