भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरातील पापा नगर भागात माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू व समाजसेवक शरीफ ठेकेदार यांनी पापा नगर भागातील मशीदी नजिकच्या मोकळ्या जागेत गरजु गरीब व हातमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यां सर्व महिलांना गव्हाचे 5 किलो पीठाचे वाटप केले.
यावेळी सर्व महिलांनी पीठ मिळावे याकरीता एकाच ठिकाणी जमाव केला सुमारे 1200 ते 1500 महिलांची गर्दी झाली . यामुळे एकच गोंधळ झाला .घटनास्थळी त्वरीत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे स.फौ.तस्लिम पठाण,सचिन पोळ,गजरे ,रविंद्र साळुंखे,यांनी मोठ्य शिताफिने जमाव पांगवला व परिस्थिती नियंत्रणात आणली . दात्यांचा उद्देश चांगला होता मात्र गर्दी करु नका, गर्दी मुळे धोका निर्माण होतो .लॉक डाउन व संचारबंदी बद्दल उपस्थित दात्यांना व महिलांना सूचना केल्या .जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जमावबंदी आदेश जारी केले आहे. परिस्थिती ओळखा भान ठेवा असे सांगितले . कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराची भीती न बाळगता जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे पोलिस बांधव आपल्या साठी जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्य करीत आहे .त्यांना सहकार्य करावे असे आवाहन भुसावळ शहरातील सूज्ञ नागरिक करीत आहे .


