जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी :चोरीच्या 20 दुचाकींसह पाच आरोपी जाळ्यात :

जळगाव – जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या 20 दुचाकींसह पाच आरोपींना अटक केली आहे. अटकेतील दोन आरोपीविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तर जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांचे रॅकेट समोर आल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन (28, रा.धानोरा, ता.धरणगाव) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट (30, रा.वाघळूद, ता.धरणगाव), अविनाश सुनील पाथरवट (20, रा.वाघळूद, ता.धरणगाव), शाहरुख रसमतुल्ला खाटीक (28, रा.लक्ष्मीनगर, जळगाव) सुरेश उत्तम मोरे (45, रा.वाघळूद, ता.धरणगाव) यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत 20 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर या दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त दुचाकींपैकी पाच दुचाकी जिल्हापेठ हद्दीतील असून अन्य 15 दुचाकींबाबत आरटीओ विभागाला पत्र देण्यात आले असून इंजिन व चेसीस क्रमांकावरून दुचाकींची खातरजमा केली जात आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, राजेश पदमर, मिलिंद सोनवणे, राहुल पाटील, अमितकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, नरेंद्र दिवेकर, प्रवीण जाधव, विकास पहुरकर आदींच्या पथकाने केली.