जळगाव : जळगाव शहर पोलिसांनी यावल तालुक्यातील दहिगाव येथील 35 वर्षीय दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आसीफ बशीर पटेल (35, दहिगाव) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 19 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.
आरोपी पटेल याने जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतून एक आणि जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतून 18 अशा 19 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देत दुचाकी यावल तालुक्यातील सावखेडासीम गावी विकल्याची देखील त्याने कबुली दिली आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे अकरा आणि जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई जळगाव शहरचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या गुन्हे शोध पथकातील एपीआय रामचंद्र शिकारे, उपनिरीक्षक राजु जाधव, सहायक फौजदार सुनील पाटील, हवालदार संतोष खवले, उमेश भांडारकर, सतीश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, पांचाळ, प्रणय पवार आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.



