भुसावळ (प्रतिनिधी ) –
४० लाखाच्या खंडणी प्रकरणी येथील नगरसेविकेंचे पती
संजय आवटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे .
जिल्हा न्यायाधीश डोरले यांनी काही अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन चा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे आरोपी संजय दत्तू आवटे यांना 50 हजार रुपये जामीन हुकुम करण्यात आलेला आहे तसेच आरोपीस दर रविवारी बाजारपेठ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे हजेरी देण्याचे आदेश काढण्यात आलेला आहे.
खंडणी प्रकरणामध्ये संजय आवटे यांना अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून याखटल्या बाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, दिनांक 22 /2 /2020 रोजी भरत गिरणारे यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की, भुऱ्या बारसे व इतर लोकांनी त्याच्याकडून चाळीस लाख रुपये खंडणीची मागणी केली होते व त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली होते त्याप्रमाणे त्याप्रमाणे कलम 365 ,384 ,323, अन्य नुसार गुन्हा नंबर.60/2020 प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये काही आरोपींना अटक करण्यात आलेली होती व व आरोपी संजय दत्त आवटे यांनी जिल्हा न्यायालय भुसावळ येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता सदर अर्ज आज सोमवार २३ रोजी जिल्हा न्यायाधीश डोरले यांनी काही अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन चा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे आरोपी संजय दत्तू आवटे यांना 50 हजार रुपये जामीन हुकुम करण्यात आलेला आहे व आरोपीस दर रविवारी बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे हजेरी देण्याचे आदेश काढण्यात आले आहे . आरोपीतर्फे भुसावळ येथील अँड. मनिष सेवलानी व अँड
चरणजीत सिंग यांनी काम पाहिले .



