भुसावळ – गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुरुद्वारा अखंड पाठ साहेब समाप्ती झाली गुरुद्वारात आयोजित केलेल्या लंगर मध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादचा लाभ घेतला येथील जळगाव रोडवर गुरुद्वारा गुरुनानक जयंती निमित्त कार्यक्रम झाला बुधवार पेठ शुक्रवार असे तीन दिवस गुरुद्वारात कार्यक्रम झाला तीन दिवस सकाळ संध्याकाळ येथे अन्नदान करण्यात आले . दोन्ही वेळेस सुमारे एक हजार भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला .

शुक्रवारी 5000 भावीकांनी लंगर प्रसादाचा लाभ घेतला जयंती निमित्त सकाळी चहा नाश्ता जेवण तयार करण्यासाठी समाज बांधवांतर्फे सर्व मिळून खर्च केला जातो काही दानशूर व्यक्ती सुद्धा एक वेळचा जेवणाचा पूर्ण खर्च देतात स्वयंपाक तयार करण्यासाठी समाज बांधवांचा आणि महिलांचा जास्त सहभाग होतो तीन दिवसात 9000 भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला येथील गुरुद्वार येथील गुरुद्वारा दररोज सकाळी साडे आठ ते नऊ या वेळेत तीनशे लोकांच्या नाष्टाची व्यवस्था करण्यात आली सकाळी प्रभात फेरीत सहभागी झालेल्या सर्वांना चहा नाश्ता दिला जातो का दुपारी तसेच रात्री सुद्धा आठ ते दहा वाजेपर्यंत प्रसाद झाला शुक्रवारी रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला रात्री दहा ते 1. 20 या वेळात गुरुनानक यांच्या जन्मदिन साजरा करण्यात आला रात्रीच्या जन्मोत्सवानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली


