जळगावात कारमध्ये २० लाखांची रोकड सापडली

जळगाव –

विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत आहेत. यावेळी जळगाव शहरात पोलिसांना आज वीस लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. सदरची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात पोलिसदल आणि आयटीबीपीच्या जवानांकडून ही नाकाबंदी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या नाका बंदीमधे आज वीस लाख रुपयांची पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड मिळून आले आहेत. तर अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत पोलिसांनी जप्त केला आहे. जळगाव जिह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या रक्कमेमुळे खळबळ उडाली आहे.