भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार जनता कर्फ्यू मुळे भुसावळ विभागात दि. २२ रोजी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात डाउन भुसावळ- बडनेरा मेमू ट्रेन. अप बडनेरा -भुसावळ मेमू ट्रेन. डाउन भुसावळ कटनी पॅसेंजर. डाउन भुसावळ वर्धा पॅसेंजर. अप मनमाड इगतपुरी पॅसेंजर. अप-डाउन भुसावळ देवळाली पॅसेंजर. अप भुसावळ सूरत पसेंजर, डाउन भुसावळ इटारसी पसेंजर, डाउन मनमाड पुणे पसेंजर या पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. या शिवाय चालीसगांव धुळे पॅसेंजर, जळंब खामगांव पॅसेंजर, बडनेरा अमरावती पॅसेंजर, बडनेरा नरखेर पॅसेंजर, पाचोरा जामनेर (पीजे) पॅसेंजर, खंडवा बीर शटल रद्द राहतील हेगी .
रद्द मेल एक्सप्रेस गाड्या- डाउन भुसावळ निजामुद्दीन गोडवाना एक्सप्रेस. अप भुसावळ बांद्रा खानदेश एक्सप्रेस. अप मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस. डाऊन मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस. डाउन मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस. अप अमरावती मुंबई एक्सप्रेस. डाउन अमरावती-जबलपुर एक्सप्रेस. डाउन एलटीटी अलाहाबाद तुलसी एक्सप्रेस. डाउन मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस. डाउन मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर काशी एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या एसी एक्स्प्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस भागलपुर एक्स्प्रेस. डाऊन मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर गोदान एक्सप्रेस. डाउन मुंबई हावडा एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्सप्रेस. डाउन मुंबई जबल्पुर गरिब रथ एक्स्प्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड गोदावरी एक्सप्रेस. डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस प्रतापगड उद्योग नगरी एक्सप्रेस. डाऊन मुंबई-नागपूर व्हाया मनमाड नंदिग्राम एक्सप्रेस. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर एक्सप्रेस. डाउन मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस. डाउन मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस. डाउन मुंबई फिरोजपुर पंजाब मेल एक्सप्रेस. डाऊन मुंबई अमरावती एक्सप्रेस. डाऊन मुंबई नागपुर दुरंतो एक्सप्रेस.डाउन लोकमान्य टिळक पुरी एक्स्प्रेस. डाउन मुंबई हावडा मेल वाया नागपुर.डाउन मुंबई-हावडा मेल वाया जबलपूर. डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस. डाउन शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस. डाउन पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस. डाउन पुणे दानापुर एक्सप्रेस. डाउन शिर्डी पुरी एक्स्प्रेस. डाउन पुणे हटिया वाय नागपुर एक्सप्रेस. डाउन पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस. डाउन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस.४२) गाडी क्रमांक ११०७७ डाउन पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेस. डाउन पुणे नागपूर एक्सप्रेस.अप नरखेड काचीगुडा एक्सप्रेस. अप नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस. अप नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस. अप नागपुर पूणे गरिब रथ एक्स्प्रेस अप अजनी पूणे एक्स्प्रेस. अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस. अप नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस. डाउन पुणे हबीबगंज हमसफर एक्सप्रेस. डाउन मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस. डाउन पुणे अमरावती एक्सप्रेस व्हाया अकोला. डाउन भुसावळ नागपूर वाया इटारसी इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर गाडी क्रमांक ५९०७८ भुसावळ सुरत पॅसेंजर ही आपल्या वेळेनुसार धावेल.
बस आगारही बंद – दरम्यान जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर येथील बस आगारही दि. २२ रोजी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी दि.२१ रोजीच्या मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.



