गोजोरे येथील महिलांच्या दारुबंदी आंदोलनाला शिवसेना उबाठाचा पाठिंबा !


भुसावळ- तालुक्यातील गोजोरे येथे दारुबंदी होण्यासाठी महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे. या गावात दारुबंदी झाली पाहिजे. असे स्पष्ट मत शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख व मा नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, या गावात दारूमुळे लोकांना त्रास होत आहे. त्यांनी पोलीस विभागाला तशी मागणी केली आहे. महिला उघडपणे दारुबंदी होण्यासाठी आंदोलन करीत आहेत. या दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात, गावात अशांतता निर्माण होत आहे. अशी भूमिका घेऊन आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पोलीस विभागाने चौकशी करून महिलांच्या मागणीचा विचार करावा असेही दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख व मा नगरसेवक शिवसेना उबाठा यांनी .शेवटी म्हटले आहे.