ताप्ती पब्लीक स्कुल रनर : गोल्ड कप चॅम्पियनशिप फुटबॉल टूर्नामेंट इंदोर येथे संपन्न ;

भुसावळ – कप चॅम्पियनशिप फुटबॉल टूर्नामेंच इंदोर पब्लिक स्कूल मध्ये खेळण्यात आला. यात अठरा वर्षा आतील विद्यार्थिचा मुलींचा संघाचा सहभाग होता. यात भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलचा दुसरा क्रमांक आला तर इंदोर येथील पब्लीक स्कुलच्या टीमने पहिला क्रमांक मिळविला. या संघात भारतातील आठ शाळेच्या टीमचा सहभाग होता. यात मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, महाराष्ट्र,राजस्थान येथिल शाळेच्या टिम सहभागी झाल्या होत्या.या फुटबॉल मॅचसाठी ताप्ती पब्लीक स्कूल तर्फे कोच अर्जुन सणस व आकाश परदेशी तसेच सहाय्यक कोच राहुल सोनवणे,श्वेता जोशी व पल्लवी बत्रा यांनी काम पाहिले. इंदोर पब्लीक स्कुल ने ३ गोल करुण सामना जिंकला. तर ताप्ती पब्लीक स्कुलच्या विद्यार्थीनींने १ गोल करीत दोन नंबर वर येऊन रनरचा किताब आपल्या नावावर केला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला होता. भारतातून दुसरा क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले व त्यांना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लीक स्कूलच्या रनर टीम सोबत प्रिन्सिपल नीना कटलर.