जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेद्वारा रिमांड होम जळगाव येथे रिमांड होममधील ७० विद्यार्थ्यांसमवेत नारीशक्तीने चिमुकल्या बालकांसोबत दिवाळी साजरी केली. या प्रसंगी या मुलांना चिवडा व साजूक तुपातले लाडू देण्यात येऊन सोबत त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाके सुध्दा देण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारीशक्तीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम पूर्णत्वास आणला. या उपक्रमासाठी नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष मनीषा पाटील व सर्व पदाधिकारी तसेच सौं नीलिमा नायर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
याप्रसंगी श्री रविकिरण अहिरराव, अधीक्षक मुला मुलींचे बालगृह निरीक्षण गृह जळगाव अध्यक्षा सौ मनीषा पाटील, नूतन तासखेडकर, मंजुषा अडावदकर, वंदना मंडावरे, रेणूका हींगु, आशा मौर्य , हर्षा गुजराती उपस्थित होते.



