चंद्रकांत भंडारी लिखित ‌‘सिंगल बाय चॉइस‌’ कादंबरीचे थाटात प्रकाशन

जळगाव : येथील सुप्रसिद्ध लेखक आणि कृतीशील शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांचे ‌‘सिंगल बाय चॉइस‌’ या कादंबरीचे प्रकाशन डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. भालचंद्र सावखेडकर यांच्या हस्ते झाले.

लातूर विभागीय बोर्डाचे माजी सचिव शशिकांत हिंगोणेकर अध्यक्षस्थानी होते. प्राईमचे प्रकाशक प्रदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राईम पब्लिकेशन्स हाऊस सभागृहात शनिवारी सायंकाळी प्रकाशन समारंभ झाला.

शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी या शिक्षण क्षेत्रातील ध्येयवादी शिक्षक नायकाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रयोगशील सर्वांगीण शिक्षणाची ही चिंतनशील कादंबरी आहे.

प्रकाशन करताना प्रा. सावखेडकर या कादंबरीतील नायकाने एकलेपणाचा स्वीकार जगण्यासाठी करताना शिक्षक म्हणून विद्याथ हिताचा ध्येयवाद बाळगल्याने ही कादंबरी शिक्षणातील सर्वच प्रक्रिय आणि प्रणालीवर भाष्य करते ते मोलाचे आहे.

अध्यक्षीय भाषणात शशिकांत हिंगोणेकर यांनी ही कादंबरी शिक्षण क्षेत्रातील आदर्शांचे भावविश्व प्रकट करते. कादंबरीकार चंद्रकांत भंडारी यांनी मनोगतात नमूद केले की, शिक्षणातील आदर्शांची अंमलबजावणी करणारा हा नायक सजगतेने चितारलेला आहे. 40 वर्षाच्या अखंड चिंतनातून ही कादंबरी साकारली आहे. यातून शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य संवर्धित व्हावे हीच नम्र अपेक्षा आहे.

याप्रसंगी मनोगतात प्रदीप पाटील म्हणाले, मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे दर्जेदार साहित्य कलाकृतीसाठी प्राइमचे दालन यानिमित्ताने खुले झाले आहे. याप्रसंगी मनोगतात प्रदीप पाटील म्हणाले, मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे दर्जेदार साहित्य कलाकृतीसाठी प्राइमचे दालन यानिमित्ताने खुले झाले आहे.

समारंभास शहरातील शिक्षणप्रेमी, मान्यवर उपस्थित होते.