वरणगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रुळावर मिळाल्या तीन रायफल :

भुसावळ –तालुक्यातील वरणगाव स्टेशन जवळ खांब क्रमांक ४५७/१५-१७ येथे रेल्वे रुळाच्या मध्यभागी रेल्वे विभागाच्या सतर्कतेमुळे आज दिनांक २८ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तीन रायफल सापडल्याची माहिती मिळाली आहे.सदरील घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झालेले असून याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर काही अनुचित घटना घडवण्याच्या उद्देशाने तर टोळी आली नसावी.रेल्वे रुळावर रायफल आणण्यामागील उद्देश काय आहे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.मागील आठवड्यात पाच रायफल चोरी गेल्याबाबत वरणगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे कदाचित या गुन्ह्यातील रायफल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.