ठाणे जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणीवर जळगावात अत्याचार !

जळगाव – लग्नाचे आमिष दाखवत ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीवर जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तरुणाने अत्याचार केला. यातून ही तरुणी गर्भवती राहिली असून तरुणाने लग्नास नकार दिल्याने अत्याचार करणारा धनराज पासवान (२०) व त्याची आई दुर्गा पासवान (४०) दोन्ही रा. कुसुंबा, ता. जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, हा प्रकार मार्च २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सुरू होता., जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील धनराज पासवान याची ओळख ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीसोबत झाली तीला लग्नाचे आमिष दाखवत धनराज पासवान याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने लग्नाची मागणी केली असता तरुणासह त्याची आई दुर्गा पासवान या दोघांनी पीडित तरुणीला गर्भपातचा सल्ला दिला.तरुणीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने, तिला शिवीगाळ करत लग्न करणार नसल्याचे सांगितले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात धनराज पासवान व त्याची आई दुर्गा पासवान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहे.