भुसावळ : विधानसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याच्या दुसर्या दिवशी आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे यांच्यासह 12 इच्छूकांनी 20 उमेदवारी अर्ज विकत घेतले. उमेदवार आता अर्ज कधी दाखल करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

दुसर्या दिवशी एकही अर्ज नाही
विधानसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही मात्र 12 इच्छुकांनी 20 उमेदवारी अर्ज विकत घेतले. मंगळवारी पहिल्या दिवशी 11 जणांनी 18 अर्ज विकत घेतले होते. बुधवारी अर्ज घेणार्यांमध्ये अजय दामू पाटील, विष्णू नेमीचंद खोले, प्रशांत सुकदेव निकम, मनोज राधेश्याम यादव, चेतन बाळू सावकारे यांनी संजय सावकारेंसाठी तर कृणाल दत्तात्रय येवले यांनी रजनी सावकारे यांच्यासाठी अर्ज घेतले. नंदा दिलीप सपकाळे, रामदास श्रावण सावकारे, रविंद्र स्वामीजी निकम, शैलेश प्रभागर बोदडे, आशा बोदडे, जोगीलाल सुरवाडे यांनी उमेदवारी अर्ज घेतले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
आज दि 24 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित नामनिर्देशन पत्र
08 उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र वितरित संख्या : 22
नामनिर्देशन पत्र- 60
उमेदवार/व्यक्ती – 31


