भुसावळ रेल्वे मंडळाचे कर्मचारी “वुमन ऑफ द मंथ” आणि “मैन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित ;


भुसावळ – भुसावळ मंडळाच्या कर्मचार्‍यांना “वुमन ऑफ द मंथ” आणि “मैन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते 30 कर्मचार्‍यांना “वुमन ऑफ द मंथ” आणि “मैन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कर्मचार्‍यांच्या उत्कृष्टतेसाठी दिला गेला असून त्यांनी रेल्वेत लक्ष्य साधण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या समर्पण आणि मेहनतीला या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये विविध श्रेणीतील कर्मचारी समाविष्ट होते. मंडळ रेल प्रबंधकांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सतर्क राहण्यास व त्यांच्या कर्तव्यांचे पालन अत्यंत समर्पणाने करण्याबद्दल प्रशंसा केली.

तसेच, भुसावल मंडळामध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत “स्वच्छता ही सेवा” आणि 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत “स्वच्छता पखवाडा” कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी आणि बीटीसी प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या सहभागीना पुरस्कार देण्यात आले. या वेळी स्टेशन प्रबंधक, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य युनिटच्या कर्मचार्‍यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारोहाचे सूत्र संचालन वी. एस. वडनेरे यांनी केले. या प्रसंगी सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.