कामगार नोंदणी पोर्टल सुरू करा — शिशिर जावळे यांची शासनाकडे मागणी : नोंदणीसाठी आचारसंहितेची बाधा अन्याय कारक :

भुसावळ–महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाच्या माध्यमातून इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत. मात्र नुकत्याच घोषित झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 2024 मुळे आचारसंहितेचे कारण पुढे करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बांधकाम कामगार नवीन नोंदणी, विविध योजनांसाठी ची नोंदणी, बांधकाम कामगारांच्या नोंदणीकृत कार्डांचे नूतनीकरण वगैरे संबंधित विविध ऑनलाइन अर्ज माहिती कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर भरण्यासाठी आचारसंहितेचे कारण पुढे केलेले आहे. यामुळे राज्यातील हजारो बांधकाम कामगार या योजनांचा लाभ घेण्यापासून राज्यातील विधानसभा निवडणुका 2024 आचारसंहिता संपेपर्यंत वंचित राहणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळ यांचा मुख्य उद्देश्य हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजना लाभ मिळवून देणे आहे. महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांचे भविष्य मजूर होण्याकरिता महाराष्ट्रात सरकार अनेक प्रकारच्या योजना काढल्या आहेत त्या योजनांमध्ये बांधकाम कामगार योजना ही एक प्रमुख योजना आहे या योजनेअंतर्गत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे सामाजिक सुरक्षा देणे कामगारांच्या मुलांचे शिक्षण घेतात स्कॉलरशिप देणे कामगारांच्या आरोग्यासाठी मदत देणे यास अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजना मार्फत सुरू केलेल्या आहेत. बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगार आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू,साहित्य सुद्धा दिल्या जातात. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारची कामगारांना बांधकाम कामगार पेटी सेफ्टी किट देतात त्यात विविध सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या सेफ्टी किट पुरवण्यात येतात. तसेच जीवनावश्यक वस्तू म्हणून भांडी वगैरे सुद्धा विविध साहित्य बांधकाम कामगारांना पुरविण्यात येते. याचं अनेक शासकीय योजनांचा लाभ या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे. यासाठी नवीन बांधकाम कामगार नोंदणी राज्यामध्ये सुरू होती तसेच बांधकाम कामगारांना कामगार मंडळाकडून देण्यात येणार स्मार्ट कार्ड नूतनीकरणाची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होते.मात्र नुकतेच महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका 2024 जाहीर झाल्यात. मात्र महाराष्ट्र कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन कामगार नोंदणी व स्मार्ट कार्ड नूतनीकरणाच्या योजनेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करत असताना सदर कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरील पोर्टलवर आचारसंहितेमुळे नवीन क्लेम थांबविलेले असल्याचा संदेश दर्शविण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी आणि स्मार्ट कार्ड नूतनीकरण रखडलेले आहे. त्यामुळे हे सर्व मंडळाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी कल्याणासाठी सदर योजनेचा त्यांना लाभ मिळण्यासाठी नवीन नोंदणी करण्यासाठी स्मार्ट कार्ड नूतनीकरणासाठी पुढे करण्यात आलेलं घालण्यात आलेल आचारसंहितेच जाचक कारण,निर्णय त्वरित रद्द करावां व पोर्टल पुन्हा सुरू करावे नवीन नोंदणी आणि नूतनीकरण सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य तथा निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली असल्यास त्यांनी कळविलेले आहे तसेच राज्यात इतर विविध योजना शासनातर्फे राबविण्यात येत असून फक्त याच योजनेसाठी आचारसंहितेची अट लावणे हे अन्यायकारक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते जावळे यांनी म्हटलं आहे.