रोटरी क्लब ऑफ भुसावळला प्रांतपाल राजेंद्रसिंह खुराना यांची भेट

भुसावळ – नागपूरहून आलेले डिस्ट्रिक्ट 3030चे गव्हर्नर राजेंद्रसिंह खुराना यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळला भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. ही मिटिंग सचिव आरती चौधरी यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.
त्यानंतर रोटरी हाॅल, चक्रधरनगर येथे पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या नंतर व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष अनंत पाटील, सचिव आरती चौधरी, उपप्रांतपाल जी. आर. ठाकुर, प्रांतपाल राजेंद्रसिंह खुराना, पत्नि गिन्नी खुराना उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अनुष्का आंबेकर हिच्या मधुर “गणेश वंदना” ने झाली.
रोटरी क्लब चे अध्यक्ष अनंत पाटील यांनी आता पर्यन्त झालेल्या व या पुढे होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी “नलिनी अनिल ठाकरे” या गरीब गरजू महिलेला शिलाई मशीन देऊन, या महिलेच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था रोटरी क्लब भुसावळच्या मदतीने करण्यात आली. यासाठी आर्थिक मदत संजय चापोरकर यांनी केली. तसेच निलेश चौधरी यांच्या मदतीने रोटरी क्लब भुसावळ, गरीब मुलांना मोफत एम. पी. एस. सी. परीक्षेच्या मार्गदर्शनासठी दर रविवारी क्लासेस सुरू करत असल्याचे जाहीर करुन निलेश चौधरी यांचा सत्कार प्रांतपालांच्या हस्ते करण्यात आला.
उप प्रांतपाल जी. आर. ठाकुर यांची ओळख प्रा.नीता चोरडीया यांनी केली.
या वेळी रेल्वेचे निवृत्त अधिकारी आर. डी. क्षिरसागर व भारती चव्हाण यांनी प्रांतपालांच्या हस्ते पिन लावुन रोटरी क्लब ऑफ भुसावळ मधे प्रवेश केला.
जी. आर.ठाकुर यांनी प्रांतपाल खुराना यांची ओळख करून दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रांतपाल खुराना यांनी रोटरी भुसावळच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व रोटरीचा उद्देश निस्वार्थ समाजसेवा हाच असल्याचे स्पष्ट केले. या साठी जर काही मार्गदर्शन अथवा आर्थिक मदत लागल्यास रोटरी डिस्ट्रिक्ट सदैव तयार आहे असे आश्वासन दिले. सुत्रसंचलन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाच्या रागिणी पुराणिक, सार्थक चोपडा,
रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शहा,
संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ भुसावळचे गोपाळ तिवारी, हेमंत नाईक, सारंग चौधरी, मदन बोरकर, महेश भराडे, मंगला पाटील, चारू महाजन, राजेश अग्रवाल, ऋषी शुक्ला हजर होते.
आभार प्रदर्शन संजय चापोरकर यांनी केले.