टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिकेत भारताला रौप्य पदक ; जळगावचा तुषार चोरडिया भारतीय संघाचे कर्णधारपदी :

जळगाव – टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिकेत भारताला रौप्य पदक जळगावचा तुषार चोरडियाला होता भारतीय संघाचे कर्णधारपदी भुसावळ:-बिसीसीआय आयोजित विज्जी ट्रॉफी वेस्ट झोनटीम आणि एम. जे. कॉलेज व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्रिकेट संघाचे कर्णधार तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ जळगावचा खेळाडू तुषार चोरडिया यांना इंडियन टेनिस बाल क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले. हि स्पर्धा नुकतीच मालदीवज येथे पार पडली यामध्ये तुषार चौरडिया याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने दुसरे स्थान पटकावले स्पर्धेत चोरडियाची चमकदार कामगिरी राहिली. लवकरच एशिया चषक होणार आहे त्याची तयारी चालू आहे. ह्या आधी त्यानी टेनिस बॉल क्रिकेट शालेय स्पर्धा सोलापूर येथे झाली होती तिथे त्यांनी महाराष्ट्र संघात सहभाग घेतला होता. तुषार यास जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन सचिव वासेफ पटेल व महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट सचिव डॉ. मोहम्मद बाबर यांनी मार्गदर्शन केले.

इंडो- मालदीव आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या मालिकेत भारताने दुसरे स्थान (रौप्य पदक) मिळवले. इंडो-मालदीव आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिका एकुवेनी क्रिकेट ग्राउंड, माले (मालदीव) येथे संपली, त्या मधे चार संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत भारताने दुसरे स्थान पटकावले. पुरस्कार विजेते – मालिकावीर कर्णधार तुषार चौरडिया माले स्पोर्ट्स क्लबकडून एसबीसीएफआयला विशेष पुरस्कारः डॉ. एमडी लतीफुद्दीन, मोहम्मद नसीर ( मालदीवचे क्रिकेट बोर्ड सदस्य),डॉ. एमडी लतीफुद्दीन आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनचे समन्वयक), इम्रान अहमद लारी (भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघाचे सचिव) यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. इंडियन टेनिस बॉल क्रिकेट संघाचे कर्णधार तुषार चौरडिया जळगाव चे रहिवासी असून सध्या निम्स विद्यापीठ, शिरपुर येथे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.