भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिवस दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजेपासून विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले, तर नंतर दुपारी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.मेढे , होते तसेच शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आला. सर्व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले त्या नंतर शिक्षकांची भाषण झाली यात श्री नाना पाटील , श्री एस टी चौधरी, डॉ.प्रदीप साखरे ,
श्रीमती सरला सावकारे, यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्या विषयीची माहिती दिली


कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. जी. मेढे. यांनी यांच्या जिवना विषयी चे विचार मांडले. यात रामेश्वर मधील कनिष्ठ मध्यम वर्गात जनुलाबदिन कलाम या अशिक्षित पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली झाला. रामेश्वरम ते धनुष कोडी असा प्रवास करणाऱ्यांऱ्या नाविकाचे काम करणे हा त्यांच्या वडीलांचा व्यवसाय होता.सिताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मूर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता ते धार्मिक वृतीचे होते शिवमंदिराचे मुख्य पुजारी लक्ष्मण शास्त्री हे त्यांचे परम मित्र. त्या दोघांचे आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलमांचे बालपण केले. सर्वधर्मसमभावाची शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर ठसलेली होती.प्राथमिक शिक्षणातून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते त्याआधी भौतिक शास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी एरोडायनॉमिक्स चा अभ्यास करून घेतला व उड्डाणाच्या क्षेत्राचा जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला पण पण हवाई दलात त्यांना प्रवेश मिळाला नाही स्वामी तुझ्या नशिबी याही पेक्षा काहीतरी उदात्त आहे असे ते त्यांना म्हणाले पुढे ते संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनले आणि 1958 साली जेष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले त्यांनी त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा हावर क्रॉप्सचा आराखडा तयार करून तो संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांना दाखविला व एका वर्षात त्यांनी हावर क्राफ्ट प्राप्त तयार केली नंदी हे त्याचे नाव पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीची हावर क्राफ्ट तयार करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पुढे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला अमेरिकेत टिपू सुलतान च्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरू केले रोहिणी या उपग्रहाचे सुरू झालेला हा त्यांचा हा प्रयत्न पृथ्वी, अग्नी,आकाश,नाग अशी विविध पल्यांचे क्षेपणास्त्र तयार करून थांबला त्यांचा वैज्ञानिक प्रवासाचा उपग्रहापर्यंत पोहोचलेला आहे. डॉक्टर साराभाई डॉक्टर मेनन डॉक्टर राजा रामण्णा डॉक्टर धवन डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचे कर्तृत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. मला भाषणे करणे जमणार नाही पण उपग्रहाला कवेत देऊन ताशी 25000 किमीच्या वेगाने जाणारा निवांत बनवायला सांगा ते जमेल एका सभेचे उद्गारले त्यावेळी ते इंदिरा गांधींच्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा हा मंत्र त्यांनी देशभरात काही लोकांना अखेरच्या श्वासापर्यंत दिला. वयाच्या वर्षी ते अखंडपणे कार्यरत होते ते समास युवक यांचा विकास हे त्यांच्या आयुष्याचा मिशन होतं. मृत्यू अटळ आहे तो कुणाला चुकत नाही पण काम करताना मृत्यू यावा असं डॉक्टर कलामांना नेहमी कलमांना वाटत असे परंतु दुर्दैव असे की त्यांच्याबाबत सुद्धा असेच घडले शिलॉंग येथे डॉक्टर कलाम यांचे निधन झाले तेव्हा देखील ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते अब्दुल कलाम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत एक आदर्शवत जीवन जगले अशा या महान नेत्यास कोटी कोटी प्रणाम करून आदरांजली वाहिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एच. राठोड तर आभार प्रदर्शन डि.के . भंगाळे यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


