शिवसेना भुसावळ मतदार संघाची जागा लढविणार !– खा. संजय राऊत.


भुसावळ – जळगाव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची विधानसभा निहाय आढावा बैठक संपन्न झाली. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी चर्चा करून माहिती घेतली.
जळगाव ग्रामीण व चाळीसगाव मतदार संघाच्या संबंधात नंतर त्यांनी सात मतदार संघात लढण्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्यात भुसावळ मतदार संघात लढणार असे म्हटले आहे.
भुसावळ आढावा बैठकीत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि शेवटी भुसावळ मतदार शिवसेना लढणार असे सांगितले. या घोषणेमुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला व ” उद्धव साहेब आगे बढो…. ” आदि घोषणा दिल्या.
या आढावा बैठकीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालेला असून भुसावळ विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी संकल्प सोडला आहे.
या आढावा बैठकीत शिवसेना जिल्हा पदाधिकारी संपर्क प्रमुख मा. संजय सावंत,मा.विष्णु भंगाळे, मा. दीपकसिंग राजपूत व तालुका प्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख दीपक धांडे,बबलू बऱ्हाटे, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप सुरवाडे,ॲड.श्रीगोंदेकर,वि.सभा क्षेत्र प्रमुख उल्हास भारसके,कैलास लोखंडे,ॲड शर्मा,सुनिल भोई, पिंटू भोई, अबरार ठाकरे,ललित मुथा,रहीम गवळी,युवा सेनेचे पदाधिकारी,नबी पटेल,आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • शिवसेना भुसावळ.
  • भारतीय कामगार सेना, भुसावळ.
  • ज्येष्ठ नागरिक सेना.