भुसावळ प्रतिनिधी – संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प शिरीष महाराजांचे दिनांक चार रोजी भुसावळ शहरातील तीन ठिकाणी जाहीर प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे

शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळात हिंदू संस्कृती या विषयावर प्रवचन होईल प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक महेश फालक संजय कुमार नाहटा , श्याम दरगड आदी प्रमुख उपस्थिती देणार आहेत तर शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील मोठ्या विठ्ठल मंदिरात संध्याकाळी सात ते आठ या वेळात पंढरीची वारी तुमच्या आमच्या मनात वसलेल्या विठ्ठलाची या विषयावर जाहीर प्रवचन होणार आहे
तसेच रात्री आठ ते नऊ या वेळात मातृभूमी चौकात हिंदुत्वाचा जनसंवाद या विषयावर प्रवचन होईल तमाम भाविकांनी व तरुण भक्तांनी या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देऊन तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशाच्या वाणीतून होणाऱ्या या प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे


