कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने सहकार्य करावे – रमण भोळे

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन भुसावळकरांनी 30 मार्च पर्यंत करावे .विनाकारण .गर्दी करु नये , अनावश्यक गर्दी टाळावी. अत्यावश्यक सेवा वगळता मॉल , दुकाने , चित्रपट गृह, आठवडे बाजार ,शाळां , कॉलेज , ट्यूशन्स बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे .
कोरोना व्हायरसची भीती न बाळगता खबरदारी व काळजी घ्या .मास्क च्या ऐवजी स्वच्छ रुमाल वापरा त्याला पुन्हा स्वच्छ धुवून निर्जतुक वापरा . संशयीत लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क साधावा असे आवाहन भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी भुसावळच्या नागरिकांना केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *