अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना कोरोनाची भीती नाही- युवासेना कारवाई करणार.

भुसावळ (प्रतिनिधी ) –
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे नागरिक भयभीत आहे. भुसावळातील खाजगी अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई तर केलीच नाही पण महत्वाच्या काळात शिक्षकांनी शिकवणी मात्र सुरूच ठेवल्या आहे. के.नारखेडे विद्यालय, नाहटा महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय, महिला महाविद्यालयातील अनुदानित शिक्षकांनी क्लास सुरूच ठेवले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय, खाजगी शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून शहरातील खासगी शिकवणी क्लासेसच्या संचालकांनी सर्व क्लासेस या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा युवसेना दिनांक १८ मार्च पासून मोठ्या प्रमाणात कारवाई करेल अशी सूचना देण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून याला प्रतिबंध म्हणून नगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी व शासकीय शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रविवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले असून ते तालुक्यातील सर्व शाळांना तात्काळ पोहोचवण्यात आलेले आहेत. या नुसार आजपासून शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या परंतु खाजगी शिकवणी सुरूच होत्या.
शिक्षक विभागाला याबाबतीत गांभीर्य नसून प्रत्येक वेळेस खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घातले जात आहे, त्यांना शिक्षण विभागाची भीती तर नाहीच आता कोरोना सारख्या भयंकर विषाणूची सुद्धा भीती नाही असे वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढल्यास संबंधित शिक्षकांना व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना क्लासला पाठवू नये असे आवाहन युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *