भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील मामाजी टॉकीज रोडवरील गॅरेज मालकाने मोटरसायकला इंडिगेटर लावण्यास नकार दिल्याने तीन तरुणांनी तलवार घेऊन गॅरेज मालकास मारण्याचा प्रयत्न प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की,फिर्यादी बापूसिंग नथ्थु महाजन राहणार विकास कॉलनी भुसावळ यांचे मामाजी टॉकीज जवळ अशोक रोडवेजवळ अंड्याच्या गाडीवर काही तरुण मद्य सेवन करून परिसरातील नागरिकांना त्रास देत असतात.असाच प्रकार दिनांक 15 मार्च सोमवार रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान सुप्रिया ऑटो गॅरेज मालका सोबत घडला.तीन तरुण एफ.झेड,फॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल घेऊन गॅरेज वर इंडिगेटर लावण्यासाठी आले असता गॅरेज मालकाने लावण्यास नकार दिल्याचा राग आल्याने त्यांनी गॅरेज मालकास धमकविण्याचा प्रयत्न करीत ते तरुण महात्मा फुले नगरातील त्यांच्या घरी जाऊन गॅरेज मालकास तलवार घेऊन सोबत पाच ते सहा साथीदार घेऊन मारण्यास येत असल्याची माहिती नगरसेवक युवराज लोणारी व नगरसेवक राजेंद्र नाटकर यांना कळताच त्यांनी आपले कार्यकर्ते घेऊन घटनास्थळी धाव घेऊन आरोपी निलेश प्रकाश तायडे, कृष्णा खरारे, इमाम तडवी हे नगरसेवक व कार्यकर्त्यांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात करतांना निलेश तायडे हा हाती लागल्याने त्याला शहर पोलीस स्टेशनला जमा केले होते तर दोन आरोपी एक मोटरसायकल घटनास्थळी लावून पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यातील एक मोटरसायकल जमा केली आहे. तसेच कृष्णा खरारे यास अटक केली असून त्यांच्या जवळून तलवार ताब्यात घेण्यात आली आहे. म्हणून शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुन 51/2020 कलम 392,511,506,34 आर्म अँक्ट 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास स.फै.संजय कंखरे करीत आहे.गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे.



