भुसावळात सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेला ‘ बंद ‘ १०० टक्के यशस्वी : अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळला ;

.


भुसावळ –बांगलादेशातील अन्याय व अत्याचाराच्या निषधार्थ आज दिनांक १६ रोजी सकल हिंदू समाजातर्फे भुसावळ शहर व परीसरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला हा बंद १०० टक्के यशस्वी झाला . बाजारपेठेत संपूर्ण दिवसभर शुकशुकाट होता तर या बंदमध्ये सर्व रिक्षा सुद्धा बंद होत्या

.बांगलादेशातील अल्प संख्य हिंदू, बौद्ध, नागरिक, अबाल वृद्ध, महिला पुरुष जेष्ठ नागरिकांवर खुलेआम माणुसकीला लाजवेल असे अन्याय अत्याचार सुरु आहेत . तेथील हिंसाचारात शेकडो हिंदू कुटुंब,मॉल ,दुकान , घर वस्त्या, हॉटेल्स जाळण्यात येऊन उद्ध्वस्त करण्यात आल्यात,हिंदू अल्पसंख्य पोलिसांना जाळण्यात आले .महीलांवर् त्यांचे कुटुंबासमोर अत्याचार करून त्यांना व त्यांचे कुटुंबातील सर्वांची हत्या करण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आली . तेथील लष्कराने सुद्धा तेथील अल्पसंख्य हिंदुं वर अत्याचार केले .तेथील घटना या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या लज्जास्पद आहेत , महिलांचां आणि, संस्कार संस्कृतीचा अपमान करणाऱ्या वेदनादायी आहेत. या अशा निंदनीय घटनेचा जाहिर निषेध करण्यासाठी व तेथील अल्पसंख्याक हिंदूंवरील होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबविले जावेत व याची दाखल जागतिक मानवाधिकार आयोगाने घ्यावी यासाठी आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी भुसावळ शहर व परीसरात कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच याच् घटनेच्या निषेधार्थ भव्य मुक मोर्चाचेही आयोजन सकाळी 10वाजता अष्टभुजा देवी मंदीर ते प्रांत कार्यालय पर्यंत करण्यात आले यावेळी सकल हिंदू समाज भुसावळच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

मूक मोर्चात भुसावळ शहर आणि परिसरातील विविध हिंदुत्ववादी संघटना , सामाजिक, दुकानदार , किराणा,व्यापार, उद्योग , हौकर्स असोसिएशन,अध्यात्मिक संस्था, शाळा महाविद्यालय संस्थाचालक संघटना, चालक मालक वाहक संघटना,विविध समाज मंडळाचे प्रमुख,गणपती व नवदुर्गा उत्सव मंडळ प्रमूख , विविध सांप्रदायांचे धर्मगुरू, मंदिर संचालन प्रमुख, पदाधिकारी,प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संश्येने सहभागी झाले होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती . संपूर्ण परिस्थितीवर पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला .