भुसावळातील डॉ. महेश चौधरी यांना बेस्ट युजी टीचर नॅशनल अवॉर्ड २०२४ जाहीर ;

भुसावळ – येथील डॉ. महेश चौधरी यांना( Best UG Teacher National Award – 2024) जाहीर झाला आहे

पुणे येथे होणाऱ्या आयुर्वेद टीचर्स असोसिएशन च्या ६ व्या राष्ट्रीय वार्षिक समारंभ – ATACON – 2024 (New Horizons in AYURVEDA) भुसावळ येथील डॉ. महेश चौधरी यांना सदर अवॉर्ड केंद्रीय आयुष मंत्री . प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दि. १८.०८.२०२४ ( रविवार) रोजी पुणे प्रदान करण्यात येणार आहे. असे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झालेले आहे.

या प्रसंगी आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. राजेश कोटेचा , भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. रघुराम भट, महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे निर्देशक डॉ. रमन घुंगराळकर , तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम राजीव गांधी ई लर्निंग स्कूल , सहकार नगर , पुणे येथे दुपारी ११.30 ते १.00 दरम्यान संपन्न होणार आहे.

डॉ. महेश चौधरी यांनी शैक्षणिक क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या विविध स्तरावरील संशोधन कामानिमित्त राष्ट्रीय स्तरामधून त्यांची निवड करण्यात आलेली आहेत. त्यांचे 42 आंतर राष्ट्रीय संशोधनपर पेपर. २ पेटंट, ५ रिसर्च प्रकल्प, ४ पुस्तके प्रकाशित तसेच अनेक आंतर राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये रिसर्च पेपर प्रेसेंटेशन केलेले आहेत. त्यांची शल्य तंत्र ( Surgery) तसेच संस्कृत या विषयांमध्ये पीएचडी प्राप्त आहेत.