भुसावळात ‘ द वर्ल्ड स्कूल ‘ ’ येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा :


भुसावळ – कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘ द वर्ल्ड स्कूल ‘ भुसावळ येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते सर आणि परिवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर त्यांनी मुलांना स्वातंत्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विविध वर्गातील विदयार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले तेसच नृत्य व गायनाच्या माध्यमातून स्वतंत्र सेनानीना मानवंदना दिली तसेच शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते सर व शाळेच्या मुख्यध्यापिका मा पेट्रिश्या ह्यसेट मॅडम यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृती चिह्न व प्रमाणपत्र देण्यात आले .

कार्यक्रमास शाळेच्या मुख्यध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले