भुसावळ विभागाद्वारे ‘रेल मदद पोर्टल’ वर एका आर्थिक वर्षात 52,166 प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण



भुसावळ – भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकावर आणि ट्रेनमध्ये होणाऱ्या गैरसोयी/तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यासाठी, प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी रेल्वेकडून विविध स्तरावर काम केले जात आहे. याशिवाय भारतीय रेल्वेवरील एकीकृत रेल मदद पोर्टलवर प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान, रेल्वे प्रवासी आपली तक्रार मोबाइल ॲप, वेबसाइट, एसएमएस, 139 हेल्पलाइन, ई-मेल, सोशल मीडिया इत्यादी सर्व माध्यमांद्वारे रेल मदद पोर्टलवर नोंदवू शकतात.
रेल्वे मदद पोर्टलवर सर्व तक्रारी एकाच ठिकाणी प्राप्त होत असल्याने प्रवाशांच्या तक्रारी/समस्या/शंका यांचे निराकरण जलद रित्या करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रवाशांना संबंधित ट्रेनच्या डब्यातील स्वच्छता, आरक्षण आसनाशी संबंधित समस्या, वृद्ध प्रवाशांसाठी औषधोपचार, प्रवासादरम्यान वैद्यकीय मदत आणि प्रवासादरम्यान आपत्कालीन मदत यासह अन्य मदत केली जात आहे.
गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत, भुसावळ विभागाला रेल मदद पोर्टलवर विविध प्रकारच्या 52,166 तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यांचे 100 टक्के निराकरण करण्यात आले. सर्व तक्रारी/समस्या/शंका यांचे सरासरी 24 मिनिटांत निराकरण करण्यात आले. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल 2024 ते जून 2024 या कालावधीत भुसावळ विभागाला विविध प्रकारच्या 18,831 तक्रारी रेल्वे मदद पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. सर्व तक्रारी/समस्या/शंका यांचे सरासरी 15 मिनिटांत निराकरण करण्यात आले आणि ज्यांचे 100 टक्के निराकरण करण्यात आले आणि तक्रारींचे निराकरण केल्यानंतर, प्रवाशांकडून अभिप्राय घेतला जातो कि जेणेकरून सेवेचा दर्जा सतत सुधारता येईल.