भुसावळ। – रेल्वे द्वारा प्रवासी सुविधांचा विस्तार करताना, दिनांक 21 जुलै 2024 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत भुसावळ विभागातून जाणाऱ्या पाच गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर खिरकीया स्थानकावर पुढील सहा महिन्यांसाठी 02 मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-दानापूर-पुणे, हैदराबाद-हिसार आणि अहमदाबाद-बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. खिरकिया स्थानकावर या गाड्यांच्या आगमन/निर्गमन थांब्याबद्दल तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे.
▶️ ट्रेन क्र. १२१४९ पुणे-दानापूर एक्स्प्रेस खिरकिया येथे ०८:०० वाजता पोहोचेल आणि ०८:०२ वाजता सुटेल.
▶️ ट्रेन क्र. १२१५० दानापूर-पुणे एक्स्प्रेस खिरकिया येथे १५:१५ वाजता पोहोचेल आणि १५:१७ वाजता सुटेल.
▶️ ट्रेन क्रमांक १७०२० हैदराबाद-हिसार एक्सप्रेस खिरकिया येथे १०.२६ वाजता पोहोचेल आणि १०.२८ वाजता सुटेल.
▶️ ट्रेन क्रमांक १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस खिरकिया येथे १४.३५ वाजता पोहोचेल आणि १४.३७ वाजता सुटेल.
▶️ ट्रेन क्रमांक १९४८४ बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेस खिरकिया येथे २३.०५ वाजता पोहोचेल आणि २३.०७ वाजता सुटेल.
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा .



