प्रवाशांसाठी महत्वाची सुचना
भुसावळ – भुसावळ विभागातील खांडवा स्थानकात फलाट क्रमांक १ चे पायाभूत सुविधांचे काम होणार आहे. या कामामुळे भुसावळकडे जाणाऱ्या आणि थांबणाऱ्या सर्व अप मार्ग कडील मेल एक्स्प्रेस/पॅसेंजर गाड्या खांडवा स्थानकात अप प्लॅटफॉर्म क्रमांक 6 येथून सुटतील .

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 चे कार्य दिनांक 09.05.2024 ते 26.05.2024 पर्यंत केले जाणार आहे . दिनांक 09.05.2024 पासून कार्य सुरू झाल्यानंतर, भुसावळकडे जाणाऱ्या आणि थांबणाऱ्या सर्व अप मार्ग कडील मेल एक्स्प्रेस/पॅसेंजर गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 06 वरून सुटतील.
या कार्या दरम्यान खंडवा ते बीर शटल सेवा दिनांक दिनांक 09.05.2024 ते 26.05.2024 पर्यंत रद्द करण्यात येत आहे विवरण पुढीलप्रमाणे
1) गाड़ी क्रमांक 05690 बीर ते खंडवा शटल
2) गाड़ी क्रमांक 05689 खंडवा ते बीर शटल
3) गाड़ी क्रमांक 05686 बीर ते खंडवा शटल
4) गाड़ी क्रमांक 05685 खंडवा ते बीर शटल
5) गाड़ी क्रमांक 05692 बीर ते खंडवा शटल
6) गाड़ी क्रमांक 05691 खंडवा ते बीर शटल
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी.


