भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव यांनी 08.05.2024 रोजी भुसावळ विभागातील बडनेरा ते भुसावळ या मार्गाची पाहणी केली.
महाव्यवस्थापकांनी स्थानकाच्या पाहणीदरम्यान अमरावती स्थानकावर विकसित होत असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी स्थानकाचा फलाट, स्थानक परिसर, बुकिंग व आरक्षण कार्यालय, पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी नवी अमरावती पिंक रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली. स्थानकात विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली
बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळेत महाव्यवस्थापकांनी सविस्तर पाहणी केली. कार्यशाळेत त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. वृक्षारोपणही करण्यात आले.
बडनेरा स्थानकात स्टेशन येथे अमृत भारत योजने अंतर्गत सुरु असलेले कार्याचा आढावा घेतला. स्थानकावरील सुरक्षा आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. बडनेरा रनिंग रूम आणि लोको पायलट लॉबीची सविस्तर पाहणी केली.
बडनेरा ते भुसावळ दरम्यान विंडो-ट्रेलिंग तपासणी महाव्यवस्थापकांनी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्थानकाच्या स्वच्छतेचा व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आणि त्यांनी सध्या पुरविण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांचाही आढावा घेतला आणि प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्यासाठी कामे जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या.
भुसावळ येथील स्थानकावर विकसित होत असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली आणि कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विभागीय कार्यालयात महाव्यवस्थापकांनी सर्व शाखेचे अधिकारी सोबत चर्चा करण्यात आली.
या पाहणीवेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, संबंधित शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





