भुसावळ –

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 12- भुसावळ विधानसभा मतदारसंघ करिता शासकीय धान्य गोदाम क्र.2 भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील स्ट्रॉंग रूम मध्ये ई व्ही एम मशीन मधील सीलिंग वं सेटिंगची प्रक्रिया काल दिनांक 07-05-2024 पासून कडेकोट बंदोबस्तात सुरु झालेली होती. ही प्रक्रिया आज दिनांक 8-5-2024 पर्यंत सुरु होती.संबंधित कंपनीचे इंजिनियर तसेच मास्टर ट्रेनर यांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली वं नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक व अचूकपणे पूर्ण केली.
आज रोजी राखीव मशीनसह सिलिंग सेटिंग होऊन सर्व मशीन तयार असून त्याकरिता एकूण 20 टेबलवर प्रत्येकी 6 कर्मचारी कार्यरत होते.सदरील सिलिंगची कामे आज पूर्ण झाली.
12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक
निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भुसावळ .जितेंद्र पाटील, .तहसीलदार नीता लबडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर उपस्थित होते.


