भुसावळ येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम सिलिंग सेटिंगचे प्रशिक्षण

भुसावळ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 12- भुसावळ विधानसभा मतदारसंघ करिता EVM सिलिंग/सेटिंग तसेच EVM कक्ष अंतर्गत विविध कामे सुरळीतपणे पार पाडण्या करिता शासकीय धान्य गोदाम क्र.2 भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन मधील सीलिंग वं सेटिंग करणेबाबतचे प्रशिक्षण आज दिनांक 03/05/2024 रोजी पार पडले.सदर प्रशिक्षण करिता मास्टर ट्रेनर तसेच सर्व  नेमणूक कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना समक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच संबंधितांनी सोपवलेली जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक व अचूकपणे करावी ह्या सूचना दिल्या.

4-रावेर लोकसभा मतदारसंघातील 12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक
निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे आदी उपस्थित होते.