फुकट्या प्रवाशांविरूध्द कारवाई करणार : नवीन डीसीएम भानुदास तपस्वी –

भुसावळ : भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधकपदी भानुदास तपस्वी यांनी नुकताच पदभार स्विकारला. मंडळ वाणिज्य प्रबंधक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी भानुदास बी.तपस्वी हे रेल्वे भर्ती बोर्ड येथे सचिव म्हणून कार्यरत होते. वाणिज्य विभागामध्ये त्यांनी सहायक वाणिज्य प्रबंधक यात्री सेवा, सहायक वाणिज्य प्रबंधक आरक्षण, सहायक वाणिज्य प्रबंधक (सामान्य) अशा विविध विभागात काम केले आहे.

अनिल कुमार पाठक यांची येथेच विभागीय परिचालन प्रबंधक या पदावर बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तपस्वींची नियुक्ती करण्यात आली. फुकट्या प्रवाशांविरूध्द मोहिम राबवून रेल्वेच्या उत्पन्नात भर टाकली जाईल, माल वाहतुकीला प्राधान्य दिले जाइल, वाणिज्य विभागाच्या प्रलंबित कामांना चालना दिली जाईल व उन्हाळ्याचे दिवस असल्याने रेल्वे गाड्यांना गर्दी असल्याने अनेक प्रवासी हे आरक्षण डब्यातून जनरल तिकीटावर प्रवास करीत असल्याने त्यांच्याविरूध्द दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.