विधवा महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे बंद झालेले अनुदान सुरू करावे – नागरिकांची मागणी- अन्यथा तीव्र आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील अनेक गरजू विधवा महिलांचे संजय गांधी योजनेचे अनुदान तहसील
कार्यालया मार्फत बंद केलेले आहे त्यामुळे त्या महिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या विधवा महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे बंद झालेले अनुदान सुरू करण्यात यावे याबाबत माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या नेतृत्वात विधवा महिला व जेष्ठ नागरिक यांनी आज दिनांक ६ रोजी स्थानिक तहसिलदार यांना निवेदन दिले आहे
निवेदनात नमूद आहे की , महिला शासनामार्फत मिळणाऱ्या पैश्यावर्ती आपल्या दोन वेळेचा जेवणाचा उदर निर्वाह करतात तर काही महिला दर महिन्याला लागणाऱ्या औषधी वरती खर्च करतात ‘
परंतु गेल्या वर्ष भरपासून मुलगा २५ वर्षाचा झाल्याचे कारण सांगून भुसावळ शहरातील अनेक महिलांचे संजय गांधी चे अनुदान बंद केलेले आहे परंतु मुलगा २५वर्षाचा झाला म्हणून विधवेला संजय गांधी योजनेचा लाभ मिळणार नसेल तर तो त्या महीलेवर्ती अन्यायच असेल कारण मुलगा २५ वर्षाचा झाला म्हणजे तो कमवता झाला असे होत नाही उलट या वयामध्ये मुलांना शिक्षणासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात त्यामुळे महीलांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे
म्हणून शासनाने संजय गांधी निराधार विधवा पेंशन योजनेमध्ये मुलगा २५ वर्षाचा झाला म्हणून विधवेला अनुदान बंद चा निर्णय बदलण्यात यावा व विधवा महिलेला मरणोत्तर संजय गांधी योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
तसेच श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांचा सुध्दा वयाचे कारण सांगून लाभ बंद करण्यात आलेला आहे ह्या लाभार्थ्यांचे ६५ वर्षाची वयाची अट कमी करून ती ५८ वर्ष करण्यात यावी कारण कुठलाही राज्य शासन किव्वा केंद्र शासनाची सेवा निवृत्तीचे वय ६५ वर्ष नाही आहे मग ह्या गरीब गरजू लोकांनाच ६५ वर्षाची अट ठेऊन ह्या नागरिकांवर अन्याय केल्या सारखे आहे म्हणून आम्ही ह्या निवेदाद्वारे आपल्याला विनंती करतो की आपण राज्य शासनाला ही माहिती देऊन गरजू विधवा व ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
याबाबत सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन ,पालकमंत्रो ना. गुलाबराव पाटील , आमदार संजय सावकारे , जिल्हाधिकारी
प्रांतधिकारी यांना माहितीस्तव प्रत रवाना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *