प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील पुढीलमाणे आहेतः

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष
01085 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दि. १७.०४.२०२४ रोजी २३:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.
01086 विशेष गोरखपुर येथून दि. १९.०४.२०२४ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे ००.२५ वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: ३ वातानुकूलित- तृतीय, ७ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१६ डब्बे)
आरक्षण: उन्हाळी विशेष ट्रेन 01085 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. १७.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


