छोटा शकील को मार नही तो खैर नही ! : आमदार एकनाथराव खडसेंना धमकी : राजकीय वर्तुळात खळबळ

मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आमदार खडसेंनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांच्या तक्रारीनुसार, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना 15 आणि 16 एप्रिल रोजी मोबाईलवर फोन करण्यात आले. आले. समोरील व्यक्तीने खडसे यांना हम दाउद इब्राहिम कासर कर के आदमी है, तुम छोटा शकील को मार डालो, नहीं तो तुमारी खैर नही, अशी धमकी देण्यात आली. त्यावर खडसे यांनी विचारले की, तुम जो ये दाउद और शकील नाम ले रहे हो. ये कोण है?, मैं पहचानता नही. त्यावर समोरून बोलणार्‍या व्यक्तीने दाऊद और शकील ये डॉन है, और तुमको ये मार देंगे, असे बोलून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली याप्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघा मोबाईलवरून धमकी देणार्‍यांविरुद्ध तक्रार दाखल दिली आहे. तपास सहा.निरीक्षक संदीप दुनगहु हे करीत आहेत.