पारोळा तालुक्यातील २० वर्षीय तरुणींचा उष्माघाताने मृत्यू :

पारोळा — सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो तर काहींचे जिव गेल्याचे सुद्धा दिसून येते . अशीच उष्माघाताची घटना पारोळा तालुक्यातील वीचखेडा येथे घडली आहे. येथील वीस वर्षीय तरुणीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील वीचखेडा येथील पुनम दगडु मोरे वय २० हिला जास्त प्रमाणात ताप आल्याने औषधोपचारासाठी नातेवाईक दगडु भावराव मोरे, – बहीण अरुणाबाई दगुड मोरे, आई दगुबाई कुशाल गायकवाड
यांनी पारोळा येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिचा ताप न उतरल्याने पुढील उपचारासाठी त्यांनी एका दुसऱ्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथे घेवुन जाण्यास सांगितल्याने पुनम हीस पारोळा कुटीर रुग्णालय येथे घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषीत केले. याबाबत पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.असुन पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.