वरणगाव – शहराला १३२ कें व्ही विज उपकेंद्रातून होणारा विज पुरवठा अवेळी वांरवार खंडित होत असल्याने उकाड्याच्या त्रासाने नागरिक कमालीचे त्रस्त झाल्याने व पाणी पुरवठा योजनेवर एक्सप्रेस फिडरचा विज पुरवठा जोडणीच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने केंद्रासमोर तीन तास ठिय्या मांडला होता

शहरात पाणी पुरवठा व विज पुरवठ्याने मागील काही दिवसा पासून नागरिकांना हैरान करून सोडले आहे नगर परिषद मार्फत होणारा पाणी पुरवठा ऐन उन्हाळ्या दिवसात तापी नदीत पाणी साठा मुबलक असुनही पाण्या साठी नागरिकाना मागील काही दिवसांपासून भटकंती करावी लागत आहे नगर परिषदेच्या नियोजना अभवी चौदा ते पंधरा दिवस नंतर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकात तिव्र नाराजीचे सूर उमटत आहेत त्यात नवीन भर शहराचा वांरवार होणाऱ्या खंडीत विज पुरवठ्याने विज प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने गर्मीच्या उकाड्याने नागरिक हैराण झाल्याने शहर भाजपाच्या वतीने आयुध निर्माणी जवळील १३२ के व्ही विज उपकेंद्रावर धडक देत केंद्रातून वांरवार विज पुरवठा खंडित का होतो असा जाब विचारीत शहराला तपत कठोरा येथील पाणी पुरवठा योजनावर एक्सप्रेस फिडरची जोडणी करून शहरवाशीयाना देण्याची मागणी करीत तीन तास ठिय्या मांडला होता तर सुनिल काळे यांनी मंत्री गिरिश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी पाणी पुरवठा अभियंता डी टी पवार यांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले .
यावेळी वरणगावचे सह अभियंता डी वाय पाटील , अतिश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शे अखलाक शे युसुफ , सुनिल माळी , मिलींद मेढे , शामराव धनगर , नाना चौधरी गजानन वंजारी , बळीराम सोनवणे , ॲड ए जी जंजाळ , फहीम शे फजल , डॉ सादिक शे साबीर डॉ प्रविण चांदणे , इरफान पिजारी छोटू सेवतकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी विज अभियंत्या कडून लवकरच काम करण्याचे अश्वासन देण्यात आले


