वरणगावला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणुक

वरणगाव – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून जय भिम घोषणा देत प्रतिमा भव्य मिरवणुक काढण्यात येऊन शेकडो अनुयायांनी अभिवानद केले

घटनेचे शिल्पकार महमानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त शहरात रेल्वे स्टेशन पासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत निळे झेंडे पातका लावून परिसर सजविण्यात येऊन मागील चार दिवसा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात वकृत्व स्पर्धा , भिमगीत , रांगोळी स्पर्धा , नृत्यकला स्पर्धा आशा विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर १४ एफ्रील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी रेल्वे स्टेशन परिसरातील विश्रामगृहा जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत डी जे वाजत्री सह मिरवणुकीला सुरुवात करण्यात येऊन भिमगीतावर तरुणांनी ठेका धरून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जय घोषणाने परिसर दणाणून सोडला मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी वरणगाव पोलीसांनी सहकार्य केले तर मिरवणुकीत सामील झालेल्यांना ठिकठिकाणी थंड पाणी , सरबत , ऊसाचा रसाची व्यवस्था सेवाभावी संस्था कडून करण्यात आली होती
यावेळी मिरवणुकीत सर्वच राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामीण भागातील अनुयायी मोठया संखेने सहभागी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले